“नागपूर मेट्रोला स्पेशल प्लानिंग अँथोरीटीचा दर्जा

नागपूर : राज्य सरकारने महा मेट्रो, नागपूरला स्पेशल प्लानिंग अँथोरीटी(Special Planning Authority) चा दर्जा दिला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र रिजनल अँड टाऊन प्लानिंग कायदा १९६६(MRTP ACT-1966) च्या अंतर्गत एक परिपत्रक काढून या संबंधीची घोषणा केली आहे. महा मेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती कायम राहावी आणि या संबंधीचे नियोजन करतांना कुठलाही अडथळा उदभवू नये याकरिता राज्य शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार नामनिर्देशित केलेल्या भागांमध्ये सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या स्टेशनचे व प्रकल्पासंबंधी होत असलेले अन्य कुठलेही बांधकाम व त्या संबंधीचे नियोजन आणि या संबंधीचे अधिकार यापुढे आता महा मेट्रो कडे राहणार.

मेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती कायम राहावी या करता महा मेट्रो ला स्पेशल स्पेशल प्लानिंग अँथोरीटी(Special Planning Authority) दर्जा देण्याची मागणी महा मेट्रो ने राज्य सरकार कडे केली होती. या मागणीला अनुसरून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पाकरीता आवश्यक असलेली निर्णयाची प्रक्रिया आता सुलभ होणार असून जागतिक दर्जाच्या स्थानकांचे आणि प्रकल्पाचे निर्माण करने आता महा मेट्रो ला सहज होणार आहे.