सोलापूर जिल्हा परिषदेचा दलित वस्ती सुधारणा निधी परत गेला नाही – राजकुमार बडोले

नागपूर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनि:सारण गटारे, समाजमंदिरे आदी सोयीसुविधांसाठी दलित वस्ती सुधारणा निधी शासनाकडून दिला जातो. सन 2016-17 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेला एकूण 5 हजार 560.74 लाख रुपयांची तरतूद होती. यातील 3 हजार 731.14 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. उरलेल्या 1 हजार 829.60 लाखांच्या कामाला 2017-18 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे दलित वस्ती सुधारणा निधी परत गेला नसल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानपरिषदेत दिली.

18 कोटी दलित वस्ती सुधारणा निधी परत गेल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य रामहरी रुपनवर यांनी मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना श्री. बडोले बोलत होते.