‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या शुक्रवार दि. 13 एप्रिल रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम, इंदू मिलच्या कामकाजाची सद्य:स्थिती, समता प्रतिष्ठानची भूमिका, व्यसनमुक्ती संत साहित्य संमेलन, बौद्ध समाजासाठी व आंतरजातीय विवाहासाठी स्वतंत्र विवाह कायदा, पाली भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ तसेच वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन योजना आदी विषयांची माहिती श्री. बडोले यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.