हाताच्या ”स्कीन पिलिंग”च्या त्रासावर करा हे घरगुती उपाय..

skin

आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आपले हाथ. प्रत्येक कामात हाथ हे महत्वाची भूमिका बजावतात. परंतु बऱ्याचदा आपले त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. हातांकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे स्कीन पीलिंग म्हणजेच हाताची त्वचा निघण्याचा त्रास होतो. त्यामुळे हाताला वेदना होत नसल्या तरीदेखील अनेक गोष्टी हाताळताना त्यामुळे त्रास होऊ शकतो. योग्य वेळी घरगुती उपचार घेतले तर हे बरे होण्यास मदत होते. याकडे दुर्लक्ष केले तर अॅलर्जी होण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात यावर उपचार करण्यासाठी काही घरगुती टिप्स…

  • एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये आपल्या हातांना दररोज दहा मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा. असे करण्यामुळे त्वचा मऊ होते. तुम्ही पाण्यामध्ये मध किंवा लिंबाचा रसही टाकू शकता.

hot water

  • आपले हात कोमट पाण्यामध्ये १० ते १५ मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा आणि पुसून घ्या. हात पुसण्यासाठी एका मुलायम कपड्याचा वापर करा. त्यानंतर हातावर मालिश करण्यासाठी व्हिटॅमिन ई तेलाचा वापर करा. व्हिटॅमिन ईमुळे हात खुप काळापर्यंत मॉईश्चराईज राहण्यास मदत होईल.

vitamin e

  • थोडे ओट्स घ्या आणि गरम पाण्यामध्ये भिजवा. ते पाण्यामध्ये पुर्णपणे भिजल्यानंतर त्या भांड्यामध्ये १० ते १५ मिनिटे हाथ बुडवून ठेवा. त्यानंतर साफ पाण्याने हात धुवून ते पुसून घ्या. त्यानंतर मॉइश्चराईजरचा वापर करू शकता. जर स्कीन पीलिंग मोठ्या प्रमाणावर होत असेल तर हो उपाय तुम्ही रोज करू शकता.

oats

  • काकडी हाताच्या त्वचेला नरम आणि सुंदर बनवण्यासोबतच स्किन पिलिंगवरही उत्तम उपाय आहे. काकडीचा एक मोठा तुकडा घ्या. त्याने आपल्या हातावर मसाज करून १० ते १५ मिनिटे त्याचा रस त्वचेवर तसाच राहू द्या. त्यानंतर हलक्या गरम पाण्याने हात धुवा आणि व्हिटॅमिन ईच्या तेलाने मालिश करा.

cucumber

  • रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर किंवा जेल हातांना लावावे. सकाळी उठल्यावर हलक्या कोमट पाण्याने हात धुवावे. हाताची त्वचा मऊ होते. अनेकदा आपल्याला हाथ धूण्यासाठी सांगण्यात येते. पण हातांचे आरोग्य राखण्यासाठी एवढे करणे पुरेसे नाही. म्हणून वरील अ टिप्स लक्षात असू द्या.

aloe vera

याने तुमचे हात अॅलर्जी पासून बचावतील आणि मुलायम ही राहतील.