पंतप्रधान मोदी यांनी देशाला सांगायला हवे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर का प्रतिबंध लावले ? : सीताराम येचुरी

Sitaram Yechury

नवी दिल्ली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) चे महासचिव सीताराम येचुरी यांनी आज रविवारी (ता. २९) म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सांगायला हवे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वर प्रतिबंध लावले होते.

आज पंतप्रधान मोदीच्या बोलण्यावरून असे दिसून येते की ते प्रथमच इतिहास शिकत आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या कणखर नेतृत्वाची नोंद इतिहासानेही घेतलेली आहे .सगळ्यात मोठी बाब म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी आरएसएसला सांप्रदायिक विष पसरवण्यास दोषी मानत होते. इतकेच नव्हे तर आरएसएसवर बंदीही घातली होती. दरम्यान भारताचे ऐक्य आणि एकात्मतेसाठी सरदारजींचे योगदान आहे. पंतप्रधानांनी भारतीय समाजाच्या एकीकरणासाठी सरदारजींच्या सर्वात महत्त्वाच्या योगदानाशिवाय सर्व काही सांगितले. यासोबतच येचुरी म्हणाले की, मोदी यांनी आज खादीवर ही वक्तव्य केले ही निराशाजनक बाबा आहे. यावरून असे दिसते ही मोदी हे भारताला पुन्हा शोधात आहेत.

माझ्या जन्मापासून खादी हे भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. माझ्या जन्माच्या आधी खादी संस्थांची स्थापना झाली. दरम्यान खादीचा उपयोग फॅशनसाठी केला गेला. पंतप्रधान आम्हाला काही नवीन सांगत नाहीत. या त्या गोष्टी आहेत ज्यासोबत प्रत्येक भारतीय वाढला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विचारानुसार ते भारताला पुन्हा शोधात असल्याचे दिसत आहेत. याअगोदर मोदी म्हणाले होते की, खादी उद्योगाच्या विक्रमी वाढ गावांमध्ये परिवर्तन करण्याकरिता सर्वात प्रभावी साधन म्हणून उदयास आली आहे तर ‘खादी फॉर ट्रांसफॉर्मेशन’ या नव्या मंत्राची स्थापना केली आहे.