पुण्याच्या विकास आराखड्यासाठी सिंगापूरची निवड : मुख्यमंत्री

पुणे : सिंगापूर शासन व राज्य शासनाने पुण्यातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ७ हजार ३५७ चौ.कि मी क्षेत्रासाठी पुढील पन्नास वर्षांसाठीचा विकास आराखडा (डीपी) तयार करण्याची जबाबदारी घेतली आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र व सिंगापूर सरकारच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी या करारावर देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उद्योगमंत्री एस. ईश्वरन यांनी संयुक्त करारनाम्यावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते, सिंगापूरचे भारतातील उच्च आयुक्त लिम थ्वॉन क्वॉन , सिंगापूर सरकारचे प्रतिनिधी डॉ. फ्रान्सीस च्वॉन उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मी व्यक्तीशा सिंगापूर सरकारच्या कार्यपद्धतीने प्रभावीत झालो आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचा महत्त्वाचा वाटा होता. पुढील तीस ते चाळीस वर्षे ही भूमिका पुणे शहर निभावणार आहे. या करिता पुणे महानगर क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी सरबाणा जुरॉग कंपनीस देण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि सिंगापूर मधील हा करार हा ऐतिहासिक क्षण आहे.

सिंगापूरचेमंत्री ईश्वरन म्हणाले, महाराष्ट्र व सिंगापूर शासनामध्ये पारदर्शकतेचे सामर्थ्य आहे. मोठ्या शहरांचा विकास करण्याचा अनुभव दोन्ही शासनाला आहे. सिंगापूर छोटा देश आहे. आम्ही फार कमी देशांबरोबर काम करतो. पुणे महानगर विकासआराखड्याबरोबरच पुढील काळात विमानतळासह परवडणाऱ्या घरांसाठी देखील एकत्र काम करु.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र सरकार व सिंगापूर सरकारच्या सचिवांची पुणे महानगर प्राधिकरणाच्या आयुक्तसह समितीने स्थापन करण्यात आली. या समितीने सखोलपणे अभ्यास करून आपला अहवाल एप्रिलमध्ये सादर केला. पुढील पन्नास वर्षांचा विचार करत हा विकास आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये पुणे महानगरची वाढती लोकसंख्या आणि शहराचा चौहीबाजूने होणारा विस्तार नवीन औद्योगिक क्षेत्र, आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाहतुकीचे प्रश्न आदीबाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.