मुलीला उत्तीर्ण केल्याच्या आरोपावरून कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिवर्सिटीचे कुलगुरू सिद्धार्थ काणे यांना आपल्या पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्या मुलीला उत्तीर्ण केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने करने दाखवा नोटीस बजावली आहे. काणे हे २०१० ते २०१३ या ३ वर्षांच्या कालावधीत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक होते. याच काळात त्यांच्या मुलीने अभियांत्रिकीची परिक्षा दिली
होती. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार परिक्षा नियंत्रक विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे संरक्षक असतात.

यानुसार काणे यांची मुलगी परीक्षा देणार असल्याने त्यांनी स्वत:ला परीक्षांच्या कामापासून वेगळे ठेवणे अपेक्षित होते. शिवाय याबाबत सक्षम अधिकाऱ्याला लेखी कळवायला हवे होते. मात्र, काणे यांनी नियमानुसार काहीही केले नाही, असा आरोप करत सुनील मिश्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आहे.