मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या प्रमुख रुग्णालयांतील रक्त पेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा आहे. प्रत्येक रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रक्‍तांच्या बाटल्यांची गरज असताना सध्या फक्त २५ ते ४० बाटल्याच रक्त उपलब्ध आहेत.

रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या अडीच महिन्यांपर्यंत शस्त्रक्रिया लांबण्याची शक्‍यता पालिकेच्या आरोग्य खात्याने व्यक्‍त केली. मे महिन्यात सुटीच्याकालावधीत रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रोजच्या साठ्यापेक्षा सध्या रक्ताच्या बाटल्या कमी आहेत. सुटीचा कालावधी संपला,की आवश्‍यक पुरेसे रक्त मिळेल. रुग्णालयांकडून रक्तदान शिबिरे भरविलीजातात.

पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर रुग्णालयांत मुंबईसहराज्यातून हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना वेळेत रक्‍तमिळावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाचाही प्रयत्न असतो. त्यासाठी रक्तदानशिबिरांद्वारे रक्ताचा साठा केला जातो; मात्र एप्रिल ते जूनदरम्यान शाळा,महाविद्यालयांना सुट्या असल्याने अनेक जण गावी जातात.

त्यामुळे रक्‍तदानशिबिरांनाही अल्प प्रतिसाद मिळतो. दररोज सुमारे २५० ते ३०० रक्‍ताच्याबाटल्यांची आवश्‍यकता असतानाही त्या तुलनेत साठा कमी आहे. मे महिन्यातरक्ताचा तुटवडा अधिक असतो. सध्या गृहनिर्माण सोसायट्या, संस्था,संघटनांच्या सहकार्याने नियमित शिबिरांद्वारे रक्ताचा साठा वाढवण्याचारुग्णालयांचा प्रयत्न सुरू आहे.