सेना-भाजपा युतीचे नंदकुमार घोडेले औरंगाबादच्या महापौरपदी विराजमान

औरंगाबाद : येथील महानगरपालिकेच्या महापौरपद शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नंदकुमार घोडेले यांना प्राप्त झाला.नंदकुमार घोडेले यांना ७७ मते मिळाली तर, उपमहापौर विजय औताडे यांना ही ७७ मते पडली. या निवडणुकीत घोडेले यांनी ‘एमआयएम’चे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला.

शिवसेना-भाजप युती दुभंगण्याच्या मार्गावर असताना महापौर निवडणुकीच्या २५ दिवस अगोदर शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी जाहीर केली.त्यांनतर भाजप नेत्यांची मनधरणी करून अखेर घोडेले यांनी पाठिंबा मिळविला. आज सकाळी ११ वाजता महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांना ७७ मते घेऊन विजयी झाले. तर एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना २५ व कॉंग्रेसचे अयुब खान यांना ११ मते मिळाली. विजय औताडे यांना ७७ मते पडली.

महापौरपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर घोडेले म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रस्तावित स्मारक, शहरातील रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता या गोष्टी माझ्यासाठी प्राधान्याच्या आहेत. यासंदर्भातील संकल्पनामा देखील त्यांनी प्रसिद्ध केला.