शिशीर शिंदे राजला करणार टाटा; शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहे .या चर्चा जर खऱ्या ठरल्या तर राज ठाकरे यांचा मोठा धक्का बसणार आहे .
गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते.

शिशीर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशीर शिंदे विजयी झाले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून- मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती.