‘शियर’ फाॅर गर्ल्स….

कडक उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्या नेहमीच्या आऊटफिटमध्येही बदल होणं स्वाभाविक आहे. त्यात कॉटनच्या कपडय़ांशिवाय चैन पडत नाही. कारण कॉटन हे आपल्या शरीराचा घाम शोषून आपल्याला होणाऱ्या अॅलर्जी पासून बचावतो. पण कधी कधी त्याच त्या कपडय़ांचा कंटाळा येतो. मघ अश्यावेळेस शिअर म्हणजे पारदर्शक कापडाचा ट्रेंडी पर्याय तुम्ही वापरू शकता.

शिअर मटेरिअल पातळ आणि पारदर्शक असल्याने तुम्हाला थंडावा मिळतो. तुम्ही जिन्स किंवा ऑफिस ट्राउझरसोबत शिअर मटेरिअलचा शर्ट कॅरी करू शकता. शिअरचा टॉप जिन्सवर खुलून दिसेल. तसेच शिअर टॉपमुळे तुम्हाला ग्लॅमरस लूक मिळेल. या मध्ये आणखी एक पर्याय म्हणजे ‘ट्रान्स्परंट कुर्ती’. ट्रान्स्परंट कुर्तीसोबत लेगिंग किंवा पलाझो पँट ट्राय करा. शिअरची स्ट्रेट कुर्ती असेल तर पलाझो, क्यूलॉटस् किंवा लूझ पँट बॉटम म्हणून निवडा. असिमेट्रिकल कुर्ती असेल तर सोबत लेगिंग ट्राय करा.जर तुम्हाला वेस्टर्न लूक हवा असेल किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर तुम्ही शिअरचा वन पीस घाला. या ड्रेसमध्ये तुमचं सौंदर्य खुलून दिसेल. याशिवाय इंडियन लूकसाठी तुम्ही शिअर स्ट्राईप्सवाली साडी ट्राय करू शकता. हेवी वर्क साडी पेक्षा हि साडी कॅरी करायला फार हलकी आहे. त्यामुळे इंडियन लूकसाठी ही साडी बेस्ट आॅपशन राहील.