शाहरुखच्या ‘झिरो’ चित्रपटाचा टीजर रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘झिरो’चा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीजरमध्ये शाहरुखसोबत सलमान खान दिसत आहे. ‘झिरो’ या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरुख बुटक्याच्या अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. यात अनुष्का शर्मासह कॅटरिना कैफची महत्त्वाची भूमिका आहे. ‘झिरो’ हा रोमँटिक चित्रपट आहे. याचे लेखन हिमांशू शर्मा यांचे असून आनंद एल. राय यांचे दिग्दर्शन आहे. २१ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

एक मिनिट एकवीस सेकंदाच्या टीजरमध्ये शाहरुख खान चक्क सलमान खानच्या कडेवर बसून किस करताना दिसत आहे. त्यासोबतच या दोघांनी मजेशीर डान्सही केला आहे. झिरोच्या टीझरमध्ये चित्रपटाची कथा जरी फारशी लक्षात येत नसली….तरी शाहरूख आणि सलमानच्या डान्सचं कौतुक केलं जातंय. या दोन्ही कलाकारांची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. ‘हम जिसके पीछे लग जाते हैं, उसकी लाइफ बना देते हैं’ हा चित्रपटात शाहरूखच्या तोंडी असलेला डायलॉग यावेळी मात्र सलमानच्या तोंडी दिसत आहे. त्यामुळे चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे.