गोरक्षण जनजागृतीसाठी ‘सेल्फी विथ काऊ’ स्पर्धा

कोलकाता: वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्ट्या गोरक्षण आणि गायीचे महत्त्व याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गोसेवा परिवार या स्वयंसेवी संस्थेने ‘सेल्फी विथ गोमाता’ ही स्पर्धा आयोजित केली आहे.

त्यासाठी या संस्थेने एक सेल्फी विथ गोमाता हे अॅप्लिकेशन तयार केले असून या त्य़ाद्वारे तुम्ही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता. या स्पर्धेच्या विजेत्याला पाच हजारांचं रोख बक्षिस देण्यात येणार आहे.

आतापर्यंत या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरक्षण हा मुद्दा धर्म आणि राजकारणाशी जोडता कामा नये. सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले पाहिजे. गोमूत्र, दूध आणि शेण आदींपासून वैज्ञानिक सिद्धता दर्शवणारे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत, असे संस्थेचे पदाधिकारी अभिषेक प्रताप सिंह यांनी सांगितले.

सेल्फी विथ गोमाता या स्पर्धेत स्पर्धक गायीसोबतचा स्वत: सेल्फी अपलोड करू शकतो. तसेच कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबतचा सेल्फी देखील पाठवू शकता मात्र यातही गाय ही असलीच पाहीजे. या स्पर्धेसाठी तयार केलेले अॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपवर ३१ डिसेंबरपर्यंत स्पर्धकांना त्यांचे सेल्फी टाकता येऊ शकतील अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक अविशेक प्रताप सिंग यांनी सांगितले.