उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवली

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस तर, आदित्य ठाकरेंची सुरक्षा एक्सवरुन वाय प्लस करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा हा निर्णय घेतला. आता या दोन्ही नेत्यांच्या सभोवताली सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा असणार आहे.

Facebook Comments