तब्बल २५ वर्षांनी पुन्हा सोबत येणार, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित

मुंबई : तब्बल २५ वर्षानंतर ऑनस्क्रीन सुपरहिट जोडी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा सोबत येणार आहे. १९९३ मध्ये सुभाष घर्इंच्या ‘खलनायक’ मध्ये संजय व माधुरीची जोडी अखेरची एकत्र दिसली होती. पण यानंतर या दोघांनीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला.

अभिषेक बर्मन दिग्दर्शित ‘शिद्दत’ या आगामी चित्रपटात हे दोघेही झळकणार आहे. या चित्रपट पहिले श्रीदेवी झळकणार होत्या. पण त्यांच्या अकाली निधनानंतर या चित्रपटात श्रीदेवींच्या जागी माधुरी दीक्षितची वर्णी लागली. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होणार आहे.

या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉयदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहे. माधुरीने संजय दत्त सोबत काम करण्यास होकार दिल्यामुळे आता या चित्रपटाची शूटिंग पुढील महिन्यात सुरु होईल. जान्हवी कपूरच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतरही अनेकांना माधुरीच्या नावाची शंका होती. पण अखेर करण जोहरने हे वृत्त खरं असल्याचं सांगितलं.

अभिनेत्रीचे नाव जरी सर्वांसमोर आले असले तरी अभिनेत्याचे नाव आजपर्यंत गुलदसत्यात ठेवण्यात आले होते. अखेर करणने ट्विट करुन या नावावरुन पडदा उठवला. हा चित्रपट एप्रिल २०१९ मध्ये प्रदर्शित केला जाईल.