सानिया मिर्झाची बहीण होणार पती पासून विभक्त

हैद्राबाद : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाची धाकटी बहिण अनम मिर्झा हिने पती पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनम मिर्झा आणि अकबर रशीद यांचा निकाह २०१६ मध्ये पार पडला होता. पण अवघ्या दोन वर्षाच्या आतच यांचा संसार मोडला आहे.

अद्याप तरी या दोघांचे वेगळे होण्याचे कारण समजू शकलेले नाही. परंतु यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनम ही सानियाची स्टायलिस्ट असून तिचे स्वत:च फॅशन आऊटलेटही आहे. तर अकबर रशीदचा हैदराबादमध्ये बिझनेस आहे. २०१५ मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्या आधी हे दोघे रिलेशनशिप मध्ये होते. या दोघांच्या लग्नाला सलमान खान, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्त यांनीही उपस्थिती लावली होती. सलमान आणि परिणीती या लग्नात नाचलेही होते.