न्यायालयाने दिली सलमानला विदेशात जाण्याची परवानगी

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान जामिनावर बाहेर आला आहे. मात्र. त्यानंतर त्याने जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर परदेशात जाण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेला मान्य करत न्यायालयाने सलमानला विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.

सलमान खान २५ मे ते १० जुलै दरम्यान कॅनडा, नेपाळ व अमेरिकेला जाणार आहे. सलमानला जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर नुकतीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळविटाची शिकार केल्याच्या आरोपावरून सलमानला दोषी ठरवण्यात आले आहे.

दरम्यान, ५ एप्रिल रोजी सलमान काळवीट शिकारप्रकरणात दोषी ठरला होता. सलमानला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ९/५१ या कलमान्वये दोषी ठरवण्यात आले असून या गुन्ह्यासाठी ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतदू आहे. काळवीट हा लुप्तप्राय पाणी असून त्याचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या पहिल्या अधिसूचीत करण्यात आला आहे. सलमानला दोषी ठरवत जोधपूर न्यायालयातील न्या. देवकुमार खत्री यांनी त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर सलमान दोन दिवस जोधपूर तुरुंगात होता. जामीन देताना न्यायालयाने सलमानला विदेशात प्रवास करण्यासाठी न्यायालयीन परवानगी घ्यावी लागेल, अशी अट घातली होती.

सलमान जेलमधून बाहेर आल्‍यानंतर ‘रेस-३’ च्‍या शूटिंगकडे वळला. सूत्रांच्‍या माहितीनुसार, ‘रेस-३’चा सेट मुंबईमध्‍ये उभारला जाणार असल्‍याची चर्चा होती. सलमानचा ‘रेस-३’ यंदाच्या ईदचा माहोल कॅश करायला ‘रेस-३’ धडकणार आहे.

न्यायालयाने दिली सलमानला विदेशात जाण्याची परवानगी