जनेऊधारी राहुल गांधी यांची इफ्तार पार्टी – ओवैसी यांची टीका

हैद्राबाद : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची इफ्तार पार्टी जनेऊधारी पार्टी असल्याचे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)के अध्यक्ष आणि हैद्राबादचे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. ओवैसी यांनी ट्विट करताना म्हटले आहे कि, रा. स्व. संघाच्या मुख्यालयात भाषण देने त्यांच्या संस्थापकांची स्तुती करने आणि जनेऊधारी इफ्तार पार्टीत सामिल होने ठिक आहे. परंतु जर माझा पक्ष निवडणुक लढत असेल तर याला साम्प्रदायिक म्हटले असते. जेव्हाकि, प्रणव मुखर्जी यांना निमंत्रण पाठवणे आणि त्यांच्या सोबत एका टेबलवर बसणे सामान्य बाब आहे, स्विकार्य आहे, ही तर पाखंडाची पराकाष्ठा असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

वस्तुत: या महिन्याच्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमात गेले होते आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले होते. सोबतच मुखर्जी यांनी संघाचे संस्थापक हेडगेवार यांना भारत मातेचा महान सुपुत्र म्हटले होते. यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या इफ्तार पार्टीत आमंत्रित केले. या मुद्दावरून ओवैसीची ही टीका समोर आली आहे.

बुधवारी राहुल गांधी यांनी इफ्तार पार्टी दिली होती. यामध्ये प्रणव मुखर्जी यांच्यासमवेत 18 विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केल्या गेले होते. यामध्ये मुखर्जी यांच्याशिवाय माकपा सरचिटणीस सीताराम येचुरी डीएमके खासदार कनिमोझी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, बसपाचे सतीशचंद्र मिश्रा, एनसीपीचे डीपी त्रिपाठी, जदयूचे माजी नेता शरद यादव आदि उपस्थित होते.

ही पहिली वेळ आहे जेव्हा प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर प्रणव यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. इफ्तारनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करताना म्हटले आहे कि, ‘चांगले जेवण, मैत्रिपूर्ण चेहरे आणि शानदार संवादाने या इफ्तार पार्टीला संस्मरणीय बनवले.’

दोन माजी राष्ट्रपती, प्रणव दा आणि प्रतिभा पाटील वेगवेगळ्या पक्षाचे नेता, मीडिया, राजकारणी तसेच अनेक जुने आणि नवीन मित्र सामील झाले होते.