मुकेश अंबानीचा धाकटा मुलगा अनंतचाही साखरपुडा ?

बई : गेल्या आठवड्यात मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाचा साखरपुडा झाल्यानंतर आता त्यांचा धाकटा मुलगा अनंतचाही साखरपुडा होणार असल्याची चर्चा असून सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा फोटो व्हायरल झाला आणि दोन आठवड्यात अंबानींच्या घरी दुसऱ्या साखरपुड्याची चर्चा रंगू लागली. काही वृत्तात अनंत आणि राधिकाचा गुपचूप साखरपुडा झाल्याचेही म्हटले आहे.

यासंदर्भातील वृत्त हॅलो मॅगझिनने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनंत हा आकाश आणि ईशाप्रमाणेच आपला साखरपुडा करणार असून त्याचा राधिका मर्चंटसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. दरम्यान हॅलो मॅगझिनने अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाल्याचे ट्विट डिलीट केले आहे. अनंत अंबानीने कुर्ता आणि नेहरु जॅकेट व्हायरल झालेल्या फोटोमध्ये घातला आहे. तर राधिकाने काळा कुर्ता घातला आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.