दीपीका पादुकोणचा पद्मावतीमध्ये 30 लाखाचा ड्रेस

मुंबई: संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाच्या ‘घूमर’ गाण्यातील दीपिका पादुकोणचा ड्रेस सर्वाधिक चर्चेत असून त्याची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल 30 लाख रुपये आहे.

चित्रपटात दीपिकाने राणी पद्मिनीची भूमिका साकारली असून दीपिकाच्या भूमिकेची आणि तिच्या लूकची जोरदार चर्चा चित्रपट वर्तुळात आहे. या चित्रपटातील ‘घूमर’ हे गाणे नुकतेच झळकले असून या गाण्याला जशी चाहत्यांची उत्स्फूर्त दाद मिळत आहे.

राजस्थानी नृत्यप्रकार असलेला घूमर या खास गाण्यासाठी दीपिकाचाही लूकही भारदस्त असेल, याची पूर्ण खूबरदारी घेण्यात आली आहे. या गाण्यातील दीपिकाच्या ड्रेसची किंमत ३० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दीपिकाचे घूमर गाणे जबरदस्त लोकप्रिय ठरले असून अवघ्या तीन दिवसांत तब्बल २ कोटी १७ लाख ८७ हजार लोकांनी हे गाणे पाहिले आहे. २५ ऑक्टोबर रोजी हे गाणे यूट्यूबवर झळकले होते.