सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी मर्यादा दीड कोटी रुपयांपर्यंत- चंद्रकांत पाटील

नागपूर : राज्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जास्त कामे मिळावीत, यासाठी त्यांची नोंदणी मर्यादा 50 लाख रुपयांवरुन दीड कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय देण्यासाठी 33 टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंते, 33 टक्के मजूर संस्था, 33 टक्के नोंदणीकृत संस्था याप्रमाणे कामे दिली जातील. तसेच हा पॅटर्न नगरविकास विभागातही लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री सुनील तटकरे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.