‘लोकसभा निवडणुकीपूर्वीच राम मंदिर उभारण्याचं काम सुरू ;अमित शहा

हैदराबाद : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

भाजपच्या तेलंगणा प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीला संबोधित करताना अमित शहा यांनी हा दावा केला आहे. सध्या न्यायालयीन घटनाक्रम पाहता राम मंदिराच्या बांधकामास लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरुवात होईल, असा विश्वास अमित शहा यांनी या बैठकीत व्यक्त केल्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी. शेखर यांनी सांगितले . त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राम मंदिर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र अमित शहा यांनी त्यावर पहिल्यांदाच मौन सोडल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लिंक