‘आम्रसूत्रा”वरून राज ठाकरेंनी घेतली संभाजी भिडेंची फिरकी

ठाकरे यांचा मोदी आणि शहा यांच्यावरही हल्लाबोल

मुंबई: माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, या संभाजी भिडेंच्या अजब विधानावर आता मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रात दोन महिला दाखवल्या आहेत. त्यातील एका महिलेच्या हातात व्यंगचित्र दाखवण्यात आलं. या बाळाच्या चेहऱ्याऐवजी राज यांनी आंबा दाखवला आहे. या बाळाला पाहून दुसरी महिला ‘अय्या ! भिडेंच्या बागेतून वाटतं,’ असं म्हणत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं आहे. सध्या फेसबुकवर या व्यंगचित्राची मोठी चर्चा आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी सरकारने नुकताच थेट कार्पोरेट क्षेत्रातील बड्या नोकरदारांना थेट सहसचिव (IAS अधिकारी) होता होईल असा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत सूचना, हरकती मागवल्या आहेत. मात्र, जे हुशार विद्यार्थी अभ्यास करून, मेहनत करून स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी यावर नेमकं बोट ठेवलं आहे. मोदी सरकारचा हा निर्णय उद्योगपतींसाठी घेतला असून, मागच्या दाराने उद्योगपती धार्जिणे बाहेरील क्षेत्रातील लोक (कार्पोरेट) सरकारमध्ये घुसविण्याचा हा प्रयत्न असल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.

मोदी-शहांच्या पाठीमागे उद्योगपती लपल्याचे दाखवले आहे तर अशा लोकांचे स्वागत करण्यासाठी मोदी- शहा उतावीळ झाल्याचे दाखवले आहे तर दुसरीकडे, स्पर्धा परीक्षा सदेऊन उत्तीर्ण झालेले IAS अधिका-यांच्या उरावर हे बाहेरील लोक बसल्याचे दाखवले आहे.