भाजपाने सत्तेचा दुरुपयोग करू नये : राज ठाकरे

मुंबई : कर्नाटकमधे सत्ता स्थापना करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसमध्ये टक्कर सुरु आहे . त्यामुळे येथे सत्ता कोणाची स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . कर्नाटकचे राज्यपाल हे भाजपाच्याच बाजूने जाणार, पण सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करु नये अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे केली .

कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार आपलाच असल्याचा दावा भाजपाने केला असला तरी, काँग्रेसने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाशी निवडणुकोत्तर आघाडी करुन बहुमताचा आकडा गाठल्याने नव्या आघाडीलाच सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली पाहिजे असा प्रतिदावा राज ठाकरे यांनी केला आहे.