रेल्वे सेवानिवृत्त कर्मचा-यांना नोकरी देणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आपला वारसा वाचवण्यासाठी जुने मित्र अर्थात सेवानिवृत्त कर्मचा-यांची सेवा घेणार आहे. यासाठी 65 वर्षाखालील सेवानिवृत्त कर्मचा-यांची भर्ती केली जाणार आहे. या कर्मचा-यांना पारिश्रमिक म्हणून 1200 रुपये प्रति दिवसाप्रमाणे दिले जाणार आहे. यासंबंधिची माहिती रेल्वे बोर्डाच्या एका अधिका-याने दिली.

वाफेवरील इंजन, जुने डबे, वाफेने चालणारी क्रेन, जुन्या काळातील सिग्नल, स्टेशन उपकरण आणि वाफेवर चालणारे उपकरण, यासारख्या जुन्या वस्तूंचे जतन करून त्यांना संरक्षित तसेच पुर्नस्थापित आणि पुर्नजिवित करण्यासाठी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचा-यांना सामिल करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

क्षेत्रिय प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जुन्या वस्तुंचे योग्य संरक्षण आणि त्यांचे प्रदर्शन सुनिश्चित करण्याची गरज आहे. झोनल रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या पत्रानुसार बोर्डाने विभागाच्या प्रमुखांना जास्तीत जास्त 10 सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या भर्ती करण्याचा अधिकार दिला गेला आहे. ज्यांच्याकडे पुनरुद्धार आणि संरक्षणसंबंधी सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचे योग्य कौशल्य आहे.