राज्यसरकारांचे बलात्काऱ्यांना अभय का?, राहुल गांधीचा मोदींना सवाल

नवी दिल्ली: महिला आणि मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून केंद्र सरकार मौन आहे राज्यसरकारे बलात्कारी आणि मारेकऱ्यांना अभय का देत आहेत?,’ असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या प्रकरणी केला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ कँडल मार्च काढून सरकारचा निषेध केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.

मोदीजी तुम्ही गप्प का आहात, तुमचं मौन राहणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही,’ असा हल्ला चढवतानाच ‘बलात्कारी आणि मारेकऱ्यांना राज्यसरकारे पाठिशी का घालत आहेत? तुम्ही काहीतरी बोला, देश तुमची वाट पाहतोय,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून नरेंद्र मोदी यांना हा संतप्त सवाल केला आहे. ‘महिला आणि मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यावर तुम्हाला काय वाटतं.

महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. देशातील महिला भयभीत झाल्या आहेत. त्या घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी आता ‘बेटी बचाओ’ची मोहिम सुरू केली पाहिजे,’ असे सांगतानाच ‘महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नाकडे राजकीय मुद्दा म्हणून पाहू नये. हा प्रश्न राष्ट्रीय प्रश्न म्हणून हाताळला पाहिजे,’ असेही राहुल यांनी सांगितले होते. काल मध्यरात्री इंडिया गेटवर निघालेल्या कँडल मार्चमध्ये राहुल गांधी सहभागी झाले होते. ‘