फक्त पाणे तीन मिनिटात आटोपली राहुल गांधींची बांद्र्यातील पत्र परिषद

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बांद्रा येथे सकाळी आयोजित पत्रपरिषद फक्त पावणे तीन मिनिटात संपली. प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स आणि ऑनलाईनचे सुमारे 100 पत्रकार ही पत्र परिषद कव्हर करायला आले होते. येथे राहुल गांधी आधीच एक तास उशीरा पोहचले. सुरुवातीच्या परिचयानंतर काँग्रेस अध्यक्षांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या आघाडीचे नेतृत्व करण्याबाबतच्या त्यांच्या इच्छेसंबंधी प्रश्ना विचारला गेला.

हा प्रश्न वेगळा ठेवून राहुल गांधी यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) वर टीका केली. याबाबत त्यांनी फक्त 2 मिनिटांपेक्षाही कमी बोलले. यानंतर त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. नंतर पक्षाच्या एका अधिका-याने सांगितले कि, ‘राहुलजींना नागपूर, नांदेड आणि इतर ठिकाणी जायचे असल्याने उशीर होत आहे’.

मीडियाचे अनेक पत्रकार तर सकाळी सहा वाजताच बांद्रा येथील परिषदेसाठी निघाले होते. काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी माफी मागताना पीआर टीमला जबाबदार ठरविले. निरुपम म्हणाले, आम्ही स्पष्टपणे सांगितले होते कि, राहुल गांधी ईलेक्ट्रॉनिक मीडियाशी थोडावेळ बोलेल. विशेषकरून प्रिंट मीडियाला सांगण्यात आले होते कि, ते त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही. कार्यक्रम तसाच झाला, जसा प्रस्तावित होता.