राहुल गांधी, मायावती आणि लालूप्रसादकडून दलितांची दिशाभूल – सुशिल मोदी

Sushil Modi

पाटणा : मुंबई, नागपूर, दिल्ली पासून ते साता समुद्रापलकीकडील लंडन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत पाच महत्वपूर्ण स्थळ काँग्रेसच्या काळात मागील 60 वर्षांपासून उपेक्षित असून मोदी सरकारने त्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांना दलितांच्या पंचतीर्थाच्या रुपात विकसित केले असल्याचे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

ते म्हणाले कि गरीब तसेच वंचितांसाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या असून मुद्रा योजनेअंतर्ग ज्या 12 कोटी लोकांना कर्ज मिळाले आहे त्यातील 50 टक्के एसटी, एससी आणि ओबीसी असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी दलितांसाठी काहीही केले नाही तेच आता दलितांची दिशाभूल करत असल्याचे ते म्हणाले.

सुशील मोदी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर हल्ला चढवताना म्हटले कि ज्यांचे आई-वडीलांच्या 15 वर्षांच्या राज्यात दलिताचा सामूहिक नरसंहार करण्यात आला आणि 2003 मध्ये आरक्षण दिल्याविना पालिका निवडणुका केल्या गेल्या. ते दलितांची सहानुभूती मिळवण्यासाठी काठी घेऊन तोड-फोड करायला निघाले आहे. आरक्षणाच्या मुद्दावर खोटा प्रचार करण्यापूर्वी आपल्या आईला विचारावे 2004-05 च्या अर्थसंकल्पात एससी-एसटीच्या कल्याणासाठी फक्त 40.48 कोटी रुपयांची तरतूद का करण्यात आली.

रालोआ सरकारने या विभागाचे बजेट 1550 कोटी रुपये करण्यात आले. जे सरकार बेनामी संपप्ती लाटण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांना देशाची करली चिंता. ते म्हणाले कि केंद्र आणि राज्याच्या रालोआ सरकारने कमी वेळात दलितांसाठी फार काम केलेले आहे कि, राहुल गांधी, मायावती आणि लालूप्रसाद आपला चेहरा लपविण्यासाठी रोज नवीन खोटारडेपणाचा आश्रय घ्यावा लागत आहे.