सुवर्ण पदक विजेता महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवरेचे जंगी स्वागत

पुणे : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सोबतच भारताचे नाव सुवर्ण अक्षरात कोरणारा सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू राहुल आवरेचे सकाळी पुणे विमानतळावर आगमन झाले. राहुलला पुणेरी पगडी आणि पुष्प हार घालीत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

पुण्यात दाखल झालेल्या राहुलने या विजयाचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे. आपले गुरू बिराजदार आणि काका पवार यांनी पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करू शकलो याचा मोठा अभिमान वाटत असल्याचे राहुल यावेळी म्हणाला. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करू शकलो याचा खूप आनंद होतो आहे, असे राहुल यावेळी म्हणाला. आता अधिक चांगली कामगिरी करत भारतासाठी आशियायी स्पर्धेत आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे असल्याचेस्वप्न ही त्याने यावेळी बोलून दाखविले बोलून दाखविले.