सिंहगडावरील कल्याण दरवाज्याजवळ प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : येथील सिंहगडावर एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. गडावरील कल्याण दरवाजाजवळील झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगलाने आयुष्य संपवले. प्रेमसंबंधातून तरुण आणि तरुणीने जीव दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या तरुण आणि तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच, दोघांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. याबाबत वनखात्याने हवेली पोलिसांना माहिती दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.