‘दिलखुलास’ कार्यक्रमात सी.एल. थूल आणि डॉ. संदेश वाघ

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. संदेश वाघ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून मंगळवार दि. 17 एप्रिल आणि बुधवार दि. 18 एप्रिल 2018 रोजी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कायदे विषयक विचार, भारतीय संविधानातील कायदा आणि सामाजिक न्यायाचे तत्व, हिंदू कोड बिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, पुणे करार, महिला सक्षमीकरण आदी विषयांची माहिती श्री. थूल आणि डॉ. वाघ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.