हॉलीवूडमध्ये प्रियांकाला वर्णभेदाचा वाईट अनुभव

मुंबई : हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राने तेथील चित्रपट उद्योगातील काळी बाजू उजेडात आणली आहे.हॉलिवूडमध्ये वर्णभेद किती टोकाला गेला आहे हे अभिनेत्री प्रियांका
चोप्राला आलेल्या वाईट अनुभवावरून समोर आले आहे. रंग उजळ नसल्याचं सांगतआपल्याला चित्रपट दिला गेला नाही, असं प्रियांका चोप्राने सांगितले.

एवढचं नव्हे तर अभिनेत्री आणि अभिनेत्यांमधील मानधनातील तफावतीचा मुद्दाही तिने मांडला. ‘एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी बाहेर गेली होती.त्यावेळी चित्रपटाच्या स्टुडिओत कुणीतरी फोन केला. हा फोन माझ्या एजंटने
उचलला. माझी ‘शारीरिक बनावट’ योग्य नसल्याचे फोनवरून एजंटला सांगण्यातआले. फक्त वर्णभेदामुळे मला तो चित्रपट दिला गेला नाही’, असं प्रियांकाचोप्रा म्हणाली.