‘भारत’ मधे प्रियांका चोप्रासोबत दिशा पटानीही चमकणार

मुंबई : अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत प्रियांका चोप्रा फायनल झाल्‍यानंतर आता त्यात दिशा पटानीचीही वर्णी लागली आहे . ‘भारत’ सिनेमामध्‍ये दिशाला सलमानसोबत काम करण्‍याची संधी मिळाली. प्रियांकानंतर दिशाला ‘भारत’ सिनेमासाठी कास्ट करण्‍यात आले . ‘भारत’ सिनेमाचे शूटिंग दिल्ली आणि पंजाब त्‍याचबरोबर अबु धाबी आणि स्पेनमध्‍ये केले जाणार आहे. दिशाचा सलमानसोबत हा पहिला सिनेमा असणार आहे.

या चित्रपटाबाबत दिशाचे म्हणणे आहे की, ”मी भारतचा भाग बनून खूश आहे. सलमान खानसोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. मी चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची वाट बघू शकत नाही. मी अली अब्बास यांची मोठी फॅन आहे.”