सोनल मानसिंह, राकेश सिन्हा, राम शकल आणि रघुनाथ मोहपात्र राज्यसभेत नियुक्त

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेच्या चार खासदारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये देशातील प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह, आरएएस समर्थक राकेश सिन्हा, उत्तरप्रदेशातील शेतकरी नेते माजी खासदार राम शकल आणि प्रसिद्ध मुर्तीकार रघुनाथ मोहपात्र यांचा समावेश आहे.

राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त चार खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या रिक्त जागेवर नव्या चार खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनु आगा आणि के पारासन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त जागी चार खासदारांची नियुक्ती केली.

या चार सदस्यांना पुढच्या ६ महिन्यांत खासदर म्हणून राज्यसभेवर जाता येणार आहे. सरकारने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केले.