विहींप निवडणुक : प्रवीण तोगडिया युगाचा अंत, न्या. सदाशिव कोकजे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : न्यायमूर्ती व्ही सदाशिव कोकजे विश्व हिंदू परिषदेचे(विहींप) नवीन आंतरराष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच आज (14 एप्रिल) निवडणुकीत न्यायमूर्ती कोकजे यांना विद्यमान अध्यक्ष राघव रेड्डी यांच्या जागी निवडले गेले आहे.

नवी दिल्ली नजिकच्या गुरुग्राम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथीगृहात झालेल्या निवडणुकीत 273 पैकी 192 प्रतिनिधींनी न्या. कोकजे यांच्या बाजूने मते टाकली. विश्व हिंदू परिषदेची स्थापना 1964 साली झाली. विहींपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची ‘उंची’ कमी करण्यासाठी या निवडणुका घेण्यात आल्याचे जानकारांचे मत आहे.

तोगडिया यांचे पंतप्रधान मोदी, भाजपा आणि रा. स्व. संघाशी असलेले संबंध ताणल्या गेल्याने कोकजे यांना निवडणुकीत उतरविण्यात आल्याचे समजते. विद्यमान अध्यक्ष राघव रेड्डी तोगडिया यांचे जवळचे समजले जात आहे. यासाठी तिस-यांदा त्यांना निवडले गेले नाही.

न्यायमूर्ती कोकजे यांचे पूर्ण नाव विष्णु सदाशिव कोकजे असून ते वाजपेयी सरकारच्या दरम्यान 8 मे ते 19 जुलै 2008 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपास होते. कोकजे त्यापूर्वी जुलै 1990 पासून एप्रिल 1994 पर्यंत मध्य प्रदेश उच्च न्यायालयानाचे न्यायाधीश आणि एप्रिल 1994 ते सप्टेंबर 2001 पर्यंत राजस्थान उच्च न्यायालयात न्यायाधीशसुद्दा होते. ते मूळत: मध्य प्रदेशच्या इंदूर येथील रहिवाशी असून ते भारत विकास परिषदेचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहे.