फेरीवाल्यांच्या वादाला मराठी-अमराठी रुप देऊन राजकीय पोळी भाजणं चुकीचं: मुख्यमंत्री

CM-Fadnavis

मुंबई: फेरीवाल्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. फेरीवाला धोरण मंजूर करुन नियमही बनवले असून, मुंबई महापालिकेकडून त्याची अंलबजावणी सुरु आहे, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनच्या कार्यक्रमात बोलतांना दिली. फेरीवाल्यांच्या वादाला मराठी-अमराठी रुप देऊन राजकीय पोळी भाजणं चुकीचं असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

मुंबईतील एलफिन्स्टन घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मात्र फक्त अमराठी फेरीवाल्यांनाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप मनसेवर केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतही भाजपची भूमिका मांडली. फेरीवाला प्रकरणाला मराठी-अमराठी चेहरा देणं राजकीय बदमाशी आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेवरही निशाणा साधला.