मोदींच्या पत्नी जसोदाबेन इफ्तार पार्टीत, काँग्रेसच्या वंदनाकडून स्तुती

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन मोदी यांनी अहमदाबादेतील रिलीफ रोड येथे आयोजित एका इफ्तार पार्टीत सामील होऊन मुस्लिमांना खजूर भरवून त्यांचा रोजा सोडला. जसोदाबेन यांचा हा फोटो सोशल मीडिायवर लोकप्रिय झाला होत आहे. काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया आणि डिजीटल कम्यूनिकेशन प्रमुख दिव्या स्पंदनाने जसोदाबेन यांची स्तुती केली आहे आणि या फोटोंना रिट्विट करून लिहीले आहे, ‘बहुत अच्छा’

जसोदाबेन यादरम्यान लोकांशी बोलताना हसत असल्याचे दिसत आहे. उल्लेखनीय आहे कि जसोदाबेन एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे आणि पंतप्रधान मोदी यांचे गृहनगर वडनगर येथून 35 किलोमीटर अंतरावरील ब्राम्हणवाडा येथे राहतात.

जसोदाबेन अनेक सामाजिक कार्यात सहभागी होताना दिसतात. उल्लेखनीय आहे कि, मागील काही दिवसांपूर्वी जसोदाबेन छत्तीसगडला जात असताना राजस्थान येथील चित्तोडगड येथे त्यांची कार एका ट्रकवर धडकली होती. या दुर्घटनेत त्यांना सामान्य जखमा झाल्या होत्या तर त्यांच्या एका नातेवाईकाचा या अपघातात मृत्यू झाला होता.