मोदींचे मित्र मनरेगाचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाले – राहुल गांधी

चंद्रपूर :पंतप्रधान मोदींनी देशातील शेतकऱ्यांचा भरोसा तोडला, त्यांचा विश्वासघात केला, . जर सरकार उद्योगपतींना मदत करत असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांनादेखील मदत करायला हवी. आम्ही ,मनरेगासाठी जेवढे खर्च केले, तितकेच पैसे मोदींचे मित्र निरव मोदी घेऊन पळाले असल्याची , टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
मी मोदींसारखे 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देणार नाही, मला खोटे बोलायचे नाही. पण देशाचा पैसा तुमच्यासाठी खर्च करू असे आश्वासनही राहुल यांनी शेतकर्‍यांना दिले.

ते बुधवारी चंद्रपूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला 35 हजार कोटी दिले. हेच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असे राहुल यांनी म्हटले.

एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटूंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. काँग्रेसकडून खोब्रागडे कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्‍यात आली आहे.

देशातील जनतेचा पैसा बळकावून श्रीमंतांचे कर्ज माफ केले जाते आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले आहे. कच्च्या तेलाचे दर घसरुनही देशात इंधन दर चढेच असल्याचे ही राहुल यांनी सांगितले. राहुल गांधी आज चंद्रपुरातील नांदेड येथे आहेत. शेतकरी मेळाव्यात ते शेतकर्‍यांना संबोधित करत आहेत.