कॅशलेस व्यवहारांमध्येच भारताचं भविष्य: मोदी

बंगळुरू: ‘कॅशलेस व्यवहार आणि नोटाबंदीविरोधात विरोधकांनी खूप टीका केली . पण लक्षात ठेवा. प्रत्येक युगात चलन बदलत असतं. पूर्वी दगड आणि सोने-चांदीही चलन म्हणून व्यवहारात वापरले गेले. नंतर कागदाचा जमाना आला. आता डिजिटल चलनाचं युग आलं असून कॅशलेस व्यवहारांमध्येच भारताचं भविष्य आहे’, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी उजीर येथे येऊन मंजुनाथेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या एका सभेला संबोधित करताना त्यांनी नोटाबंदीवर टीका करणाऱ्यांना धारेवर घेतले .

‘सध्या देशात १२ लाखांनी लोक कॅशलेस व्यवहार करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे चांगला हेतू असेल तर अनेक अडचणीही अनेकदा चांगल्या कामाला गती देण्यास फायदेशीरच ठरतात हेच यावरून सिद्ध होतं’, असं ते त्यांनी सांगितलं.

‘आता आम्ही ड्रॉप मोर क्रॉपचा संकल्प साकारणार आहोत. हा संकल्प पुढे गेला तर नवा इतिहास रचला जाईल. या संकल्पानुसार तुम्हाला तुमचं उत्पादन विकता यावं म्हणून केंद्र सरकारनं एक नवीन योजना तयार केली आहेच त्यानुसार तुम्ही जीईएम या पोर्टलवर तुमची नोंदणी करावी लागते. राज्यसरकारांनाही हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा संपूर्ण पारदर्शी आहे. कोणतंही टेंडर नाही. नवीन योजना होती, पण बघता बघता हजारो-कोटींचा व्यवसाय सुरू झाला आहे’, असंही मोदी म्हणाले.