पेन, लिहिलेले शब्द मोजतोही ! काश्मीरच्या मुलाचं संशोधन

श्रीनगर : काश्मीर म्हटलं की बातमी बहुतेक गोळीबार, दगडफेक यांसारख्या हिंसक घटनांचीच असते. पण ही बातमी वेगळी आहे. काश्मीरमधल्या मुझफ्फर अहमद खान या ९ वर्षांच्या मुलाने लिहितांना, लिहिलेले शब्द मोजणारा पेन बनवला आहे.

मुझफ्फरने या पेनला एक छोटा एलसीडी जोडला आहे, त्यावर लिहिलेल्या शब्दांची संख्या दिसते. शिवाय, या पेनला मोबाईलशी जोडले तर तो मेसेज पाठवूनही लिहिलेल्या शब्दांची संख्या कळवतो.

राष्ट्रपती भवनात नुकतेच नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनतर्फे देशात झालेल्या नवनवीन संशोधनांचं प्रदर्शन आयोजित केले होते. त्या प्रदर्शनात मुझफ्फर अहमद खान याचा हा, लिहितांना शब्द मोजणारा ‘काऊंटिंग पेन’ही ठेवण्यात आला होता.

Facebook Comments