पंचगंगाने धोक्याची पातळी ओलांडली

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तिचे पाणी पात्राबाहेर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 63 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. पूल व काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने राज्यमार्ग आणि 13 जिल्हामार्गावरील वाहतूक अंशत: बंद झाली आहे. शहरात सखल भागांत पाणी साचून ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले होते.

जिल्ह्यातील तब्बल 51 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 16000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.