वारली चित्रकलेचे प्रणेते जीव्या म्हसे यांचे निधन

वाणगाव(डहाणू): वारली चित्रकललेला जगभरात नेणारे जीव्या सोमा म्हसे यांचे निधन आज गंजाड येथील राहत्या घरी निधन झाले. निसर्ग, जीवसृष्टी, पारंपरिक ज्ञान, समाज मूल्य व आदिवासी संस्कृती यांची वारली चित्रकलेतून जगाला ओळख करून देण्यामागे जिव्या म्हसे यांचा मोठा वाटा आहे. . आदिवासी कला संस्कृतीच्या प्रसार/प्रचाराच्या कार्यामुळे त्यांना पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

डहाणू पालघरमधील आदिवासींची प्राचीन चित्रकला असलेली वारली अस्तंगत पावत असतानाच या कलेला जीव्याबांनी सातासमुद्रापार नेऊन तिचे ख-या अर्थाने पुनरूज्जीवन केले, आदिवासींच्या वारलीला जगात मानाचे पान मिळवून दिले.