शिवसेनेला जनताच जागा दाखवेल : महाजन

पालघर : भाजपचाच गड शिवसेना बळकावू पाहत आहे. पालघर लोकसभेसाठी युती केली होती; मग आता हे राजकारण का केले असा प्रश्न उपस्थित करत आता शिवसेनेला जनताच जागा दाखवेल अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. पालघरमध्ये झालेल्या विविध पक्ष कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

देशात भाजपची 23 ठिकाणी सत्ता असल्याचे अधोरेखित करत जनता या निवडणुकीतही आपल्याच बाजूने कौल देईल, असा विश्‍वास महाजन यांनी व्यक्त केला. शिवसेनेवर निशाणा साधत ते म्हणाले, की ठाणे-मुंबई सोडली तर शिवसेनेची कुठेही सत्ता नाही. त्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना माघार घेईल, अशी अपेक्षा होती. या वेळी पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार पास्कल धनारे, भाजप उमेदवार राजेंद्र गावित आदी उपस्थित होते.