पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत होणार ७ उमेदवारांमध्ये लढत

पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७ उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार आहे. अर्ज छाननीनंतर ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. तर माघार घेण्याच्या दिवशी अपक्ष उभे असलेले राजेश रघूनाथ पाटील आणि वसंत नवशा भसरा या २ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीची चुरस वाढली होती. पण आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गहला किरण राजा, भाजपचे गावित राजेंद्र धेंड्या, कॉंग्रेसचे दामोदर बारकू शिगंडा, शिवसेनेचे श्रीनिवास चिंतामण वनगा, बहुजन विकास आघाडीचे बळीराम सूकूर जाधव, मार्क्ससीटलेनीस्ट पार्टी ऑफ इडियाचे शंकर भागा बदादे आणि अपक्ष उभे असलेले संदिप रमेश जाधव या निवडणूक रिंगणात निवडणूक लढविणार आहेत.