असिफाच्या बलात्कार प्रकरणा मागे पाकचा हात : नंदकुमार सिंह

भोपाळ : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये आसिफ या ८ वर्षांच्या बालिकेवर अमानुष बलात्कार करुन, तिची हत्या करण्याच्या प्रकरणात पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी केला आहे.

हिंदुस्थानी मुलीवरील बलात्कारानंतर ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या जातात, पाकिस्तानी एजंट हे देशात भेद निर्माण करण्यासाठी करत आहेत, अशी शंकाही नंदकुमार सिंह यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले की , काश्मिरात हिंदूंची संख्या एक टक्केही नाही. जे आहेत, ते आधीपासूनच असहाय आहेत आणि तोंडही उघडू शकत नाहीत, ते ‘जय श्री राम’च्या घोषणा कशा देऊ शकतात? काश्मिरात जे काही सुरु आहे, ते पाकिस्तानी एजंट करत आहेत.

नंदकुमार सिंह हे भाजपचे मध्यप्रदेशचे अध्यक्ष असून, खंडवा लोकसभा मतदारसंघातून भाजपा खासदार आहेत. भाजपमधील ज्येष्ठ आणि वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे.