हिंगोलीत एकाच कुत्र्याने घेतला 22 जणांना चावा

हिंगोली : तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी मध्ये चार महिलांचा समावेश आहे.

उन्हाळ्यामुळे ग्रामस्थ नेहमीप्रमाणे अंगणात झोपले असता अचानक पिसाळल्या कुत्र्याने समोर येईल त्याचा चावा घेत धुम ठोकली. गावात आराडा ओरडा झाला. रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थांना काहीही करता आले नाही.

जखमी मध्ये लहान मुलासह वयोवृद्धांचा समावेश आहे. भगवान गुठ्ठे, आनंदराव ठाकरे, शेख रसूल, उत्तम ठोंबरे, शुभम खडसे, अशोक घुगे, द्वारकाबाई गुठ्ठे, पंढरी गुठ्ठे, सुधाकर घुगे, सुरज गुठ्ठे, आंजनबाई ठाकरे, रंजनाबाई इंगोले यांच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार आहेत. तर काहीवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे.