आता अंड्यांच्या किंमतीत होणार वाढ !

मुंबई : सध्या राज्यभरात पावसाला जोरदार सुरुवात झाली असून, त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होता आहे. मात्र, आता या पावसाचा फटका अंड्याला बसला आहे. कारण अंड्यांच्या किंमतीत २० रुपयांची वाढ झाली आहे. ५५ रुपये डझन मिळणारी अंडे आता ७५ रुपये डझन मिळत आहे.

मुंबईसह राज्यात आठवडाभरापासून जोरदार पाऊस झाल्याने त्याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. मुंबई आणि उपनगरात जीवनावश्यक वस्तू पोहोचण्यात अडचण येत आहे. याचाच फटका अंड्यांला बसला आहे. मुंबई, नवी मुंबई व रागयगड जिल्ह्यात अंड्यांना चांगली मागणी आहे. या शहरात ८० ते ९० लाख अंडे एका दिवसात विक्री होतात. परंतु, पावसामुळे अंड्यांचा पुरवठा कमी झाल्याने अंड्यांच्या किंमत वाढल्या आहेत.