आता पाण्यातही धावणार रेल्वेचे नवीन इंजिन

मुंबई : मध्य रेल्वेने अत्याधुनिक वॉटरप्रुफ लोकोमोटिव्ह इंजिन तयार केले असून लवकरच ते ट्रॅकवर आणले जाणार आहे. हे इंजिन 12 इंच पाण्यातही पळणार आहे. यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवर कुठलाही परिणाम होणार नाही. सध्या वापरण्यात येणारी इंजिनमुळे 4 इंच पाणी साठले तरीही ट्रेन सेवा बंद होते. रेल्वे ट्रॅकवर 4 इंच पाणी साठले तरी सध्याचे इंजिनाच्या खाली असलेली ट्रॅक्शन मोटर खराब होते. इंजिन फेल होते आणि ट्रेन आहे त्याठिकाणीच उभी राहते.

मुसळधार पावासमध्ये मुंबईची लोकल सेवा प्रभावित होते. पण आता रेल्वे यावर उपाय घेऊन आली आहे. पण आता असे होणार नाही. या अत्याधुनिक लोकोमोटिव्ह इंजिनमुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साठलं असेल तरी ट्रेन आणि एक्स्प्रेस चालू शकतात. मागच्या काही वर्षांपासून मुंबईत पडलेल्या पावसामुळे लोकल ट्रेन ठप्प होतात. त्यामुळे रेल्वेने नवीन लोकोमोटिव्ह इंजिन बनवल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे पीआरओ सुनील उदासींनी सांगितले. हे इंजिन पावसामध्ये जमा होणाऱ्या पाण्यातही ट्रेनला खेचायला मदत करतं. या इंजिनाला कुर्ल्याच्या कारशेडमध्ये तयार करण्यात आल्याचे उदासी म्हणाले.