राज्यातही अनुसूचित जाती, जमातींना पदोन्नतीत आरक्षण : पासवान

नवी दिल्ली : पदोन्नतीत अनु. जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारला स‍‍‍‍‍‍‍र्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली मंजुरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लागू असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उच्चस्तरीय मंत्रिसमूहाच्या बैठकीनंतर दिली.

पासवान म्हणाले, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग लवकरच याबाबत आदेश जारी करेल.‘सुप्रीम कोर्टाचे निर्देश राज्यांना लागू होतील का, याबाबत आधी संशय होता. मात्र आता तो दूर झाला आहे. ’ विविध हायकोर्टांच्या आदेशांमुळे एससी-एसटी वर्गासाठी पदोन्नतीवर स्थगिती आली होती. या मुद्द्यावर केंद्राने हायकोर्टात दाद मागितली होती.

पासवान म्हणाले, आधी सरकार सुप्रीम कोर्टात दाखल फेरविचार याचिकेच्या निकालाची प्रतीक्षा करेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. अॅट्रॉसिटी कायदा जुन्या रूपात बहाल करण्यासाठी सरकारने अध्यादेश तयार केला असल्याचे पासवान म्हणाले.