आता नागपूरहून गडचिरोलीसाठी ‘शिवशाही’ वातानुकुलीत बस

नागपूर : एसटीने नागपूर-गडचिरोलीसाठी वाताणुकुलीत तसेच सर्व सोयींनीयुक्त शिवशाही आरामदायी बस सेवा 10 एप्रिलपासून सुरु केली आहे. ही बस नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावरून सकाळी ५.४५, ६.३०, दुपारी २.३०, ३ वाजता सुटेल. गडचिरोलीवरून ही बस सकाळी १०.१५, ११, सायंकाळी ६.३०, ७ वाजता राहील. या बसचा मार्ग नागपूर, उमरेड, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी, गडचिरोली असा राहणार आहे.

ही शिवशाही बस वातानुकुलित असून आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायक सिट, २ बाय २ आसन व्यवस्था मोबाईल चार्जरसह, सीसीटीव्ही कॅमेरा, उद्घोषणा प्रणाली असून बसण्याची क्षमता ४५ आहे. प्रवाशांनी या वातानुकुलित बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.